
नवी दिल्ली – गुजरातमध्ये राहणा-या १३ वर्षाचा विद्यार्थी ग्रंथ ठक्कर याने जागतिक स्तरावर झालेल्या अंकगणित चँम्पियन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे. जर्मनीमध्ये आयोजित ६ व्या जागतिक अंकगणित स्पर्धेत त्याने हा विजय मिळवला आहे. त्याला लहान मुलांच्या गटात हा पदक मिळाला आहे.
अंकगणित चॅंम्पियन स्पर्धेत गुजरातमधील ग्रंथ ठक्करला सुवर्ण पदक
जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत १८ देशांतील ४० युवक गणिततज्ज्ञांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत ठक्कर याने सर्वात कमी वेळात कोणतीही चूक न करता गणीतातील सर्व कठीण प्रश्न सोडवले. जगातील वेगवान खेळ असलेल्या (वल्ड फास्टेस्ट नंबर गेम) ‘फ्लॅश अंजनमध्ये’ ग्रंथला सुवर्ण पदक मिळवण्यात यश आले. यामध्ये पेपर आणि पेंन्सीलचा वापर करता येत होता. मात्र ग्रंथने कोणतीही मदत न घेता सर्वात कमी वेळात गणीतातील सर्व प्रश्न सोडवले. या स्पर्धेत स्पेनच्या मार्क जोरनेट दुस-या क्रमांकावर राहीला, तर जपानची इशिकावा तीस-या क्रमांकावर राहीली. ग्रंथ गणित क्षेत्रात कारकिर्द करु इच्छीत आहे. लहान मुलांच्या गटात सुवर्ण पदक पटकावणा-या ग्रंथने मोठ्यांच्या गटातही कांस्य पटकावले आहे.
