
चीनची आकाशात मारा करणारी एफएन ६ मिसाईल आणि लाँचर सिरीयातील विद्रोहींच्या हाती पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आफ्रिकेतील सुदान देशातील शस्त्र डीलरकडून तस्करी करून ही मिसाईल सिरीयन मुक्तीसेनेच्या हाती पडली असल्याचे सांगितले जात आहे. ही मिसाईल अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स आहेत. सिरीयाई बंडखोरांना ही मिसाईल पुरविण्यात सुदान सरकारमधील कांही भ्रष्ट सरकारी अधिकारीही सामील असल्याचे सांगितले जात आहे.
सिरीया बंडखोरांच्या हाती चीनी एफएन ६ मिसाईल
चीनची ही मिसाईल जगातील कांही ठराविक देशांकडेच आहेत व त्यात प्रामुख्याने आशियाई देश आहेत. अंतरराष्ट्रीय शस्त्र व्यापार निर्बंध आणि इराकमधील असद सरकारचा सहयोग असूनही सुदान चीनकडून एफएन ६ मिसाईलची जोरदार खरेदी करत आहे. ही मिसाईल भ्रष्ट अधिकार्याच्या हातून कतार, जॉर्डन, सौदी देशांतील श्रीमंतांना विकली जातात. सिरीयातील बंडखोरांकडे विविध कंपन्यांचे ४२३५ हेवेतील मिसाईल लाँचर असून एफएन ६ मिसाईल ३ ते ४ मैलांवर मारा करू शकते. हलणार्या वस्तूही याने टार्गेट करता येतात व ३.१५ किमी उंचीवरून जाणारे विमानही हवेतच हे मिसाईल नष्ट करू शकते. चीनच्या मिसाईलमधील हे सर्वोत्तम मानले जाते.
