रोनाल्डोने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर पोर्तुगाल विजयी

ronaldo
कोपेहेगेन (डेनमार्क) – रियल माद्रिद फुटबॉल क्लबचा स्टार स्ट्राइकर ख्रिस्तियानो रोनाल्डोने अतिरिक्त वेळेत केलेल्या एकमेव गोलच्या बळावर पोर्तुगालने यूरो क्वालीफायरमध्ये डेनमार्कला १-० ने हरविले आहे. संकेतस्थळ गोल डॉट कॉमच्या मते, कोपेनहेगेनच्या टेलिया पार्केन स्टेडियममध्ये रोनाल्डोने ९५ मिनिटात हेडरमार्फत सामन्यातील एकमेव गोल केला. प्रशिक्षक फर्नांडो सांतोसचा कार्यभार सांभाळल्यानंतर पोर्तुगालने पहिला विजय नोंदविला आहे. रोनाल्डो संपूर्ण सामन्यादरम्यान विशेष प्रभावित दिसत नव्हता. रोनाल्डो स्पर्धेदरम्यान, गुडघ्याच्या दुखापतीमुळे झुंजत आहे. मध्यांतरापूर्वी पोर्तुगाल मैदानात आघाडीवर होता. असे असूनही डेनमार्कचा स्ट्राइकर मायकल क्रोहन हेडलीने गोल करण्याची शानदार संधी गमाविली. रोनाल्डोने यावर्षी १८ वा गोल केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्या गोलची एकूण संख्या ५१ झाली आहे. यूरो चषक पात्रता फेरीतील सामन्यात आय गटात पोर्तुगालचा दुस-या सामन्यातील पहिला विजय आहे. तसेच तीन अंकांसोबत ते तिस-या स्थानी राहिले.

Leave a Comment