अमेरिकेने केला इसिसचे शेकडो अतिरेकी ठार केल्याचा दावा

isis
वॉशिंग्टन – सिरीयातील कोबानी शहरात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या वायुहल्ल्यात इस्लामिक स्टेट अतिरेकी संघटनेचे शेकडो अतिरेकी मारले गेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. रियर एडमिरल जॉन किर्बी यांनी सांगितले की, इराकमध्ये खराब वातावरणामुळे इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात अडथळे येत होते. मात्र आम्हाला माहित आहे की, आम्ही त्यांचे शेकडो अतिरेकी ठार केले आहेत. आम्हाला अधिकाधिक वायुहल्ले करायचे आहेत, असे त्यांनी सांगितले. आमच्या सेनेद्वारे करण्यात येणा-या वायुहल्ल्यांमुळे इस्लामिक स्टेटला माघार घेणे भाग पडले आहे. वातावरण स्वच्छ झाल्यानंतर या हल्ल्यांबाबतची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या ४८ तासांत अमेरिकेने इस्लामिक स्टेटच्या तळांवर ४० हवाई हल्ले केल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघानेदेखील इशारा दिला आहे की, जर इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांना कोबानी परिसरातून हटविण्यात आले नाही तर हजारो नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment