या आठवड्यात पिस्टोरियसला होणार शिक्षा

pistorius
जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेतील न्यायालयाने प्रेमिका रिवा स्टिनकाम्प हिच्या हत्येप्रकरणी दोषी घाषित कलेल्या ऑस्कर पिस्टोरियस याला या आठवड्यात शिक्षा सुनावली जाणार आहे. आपल्या राहत्या घरात पिस्टोरियसने गोळ्या घालून प्रेमिका रिवा हिची हत्या केली होती. दोन्ही पायाने अपंग असलेल्या या ऍथलेटिक्स खेळाडूला सजा सुनावण्यासाठी न्यायालयाने अनेक दिवस साक्षी आणि पुराव्यांची छाननी केली. न्या. थेकोजिले मासिफा आता या आठवड्यात पिस्टोरियस याला शिक्षा सुनावणार आहेत. रागाच्या भरात केलेल्या खुनाला शिक्षा देताना न्यायाधिशांच्या विवेक बुद्दीला अभिप्रेत शिक्षा सुनावली जाते. ती कारावास आणि दंड असू शकते किंवा १५ वर्षापर्यंत कारावास म्हणजे जन्मठेप देखील असू शकते. मागील महिन्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर सध्या पिस्टोरियस जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.

Leave a Comment