८ वर्षांकरिता स्टार इंडिया – स्टार मिडल इस्टला प्रेक्षपण हक्क

icc
नवी दिल्ली – आयसीसीने २०१५ ते २०२३ या ८ वर्षांकरिता होणा-या सर्व स्पर्धा आणि सामन्यांचे ऑडियो विडियो प्रेक्षपण अधिकार संयुकतपणे स्टार इंडिया आणि स्टार मिडल इस्ट या वाहिन्यांना दिले आहे. या कालावधी दरम्यान या दोन्ही वाहिन्या विश्व टी २० आणि दोन एकदिवसीय विश्वचषक सामने प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणार आहेत. यामध्ये आयसीसीकडे ७० प्रतिस्पर्धी वाहिन्यांनी बोली लावली होती. त्यात स्टार इंडिया आणि स्टार मिडल इस्ट यांना अधिकार मिळविण्यात सफलता मिळाली आहे. हा निर्णय आयसीसीच्या व्यावसयिक शाखेने दुबर्इत झालेल्या बैठकीत घेतला आहे. त्याबाबत आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यासाठी निविदांची प्रक्रिया जुलै २०१४ मध्ये सुरु करण्यात आली होती आणि १७ प्रतिस्पर्ध्यांमधून दोघांची निवड करण्यात आली आहे. सध्या आयसीसीचे ऑडियो विडियो अधिकार इएसपीएन स्टार स्पोर्टसकडे आहेत. पुढील वर्षीच्या आयसीसी विश्‌वचषक स्पर्धेनंतर ते संपुष्टात येणार आहे. त्यानंतरच्या ८ वर्षांसाठी हे अधिकार नव्या निविदा कर्त्यांना दिले जाणार आहेत.

Leave a Comment