मनसे उमेदवार शिवसेनेत डेरेदाखल

shivsena1
परभणी – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पैसे वाटप केल्याप्रकरणी चर्चेत असणारे परभणीत आता शिवसेना-मनसे यांच्यातील जवळीक आणखी वाढत असल्याचे दिसून आले आहे. कारण येथील मनसेचे उमेदवार विनोद दुधगावकर यांनी मतदानाला अवघे दोन दिवस राहिले असतांना शिवसेनेत प्रवेश केला आहे. “एमआयएमच्या जातीयवादी उमेदवाराला रोखण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे”, असे दुधगावकर यांनी म्हटले आहे. परभणीमध्ये शिवसेनेने डॉ. राहुल पाटील, तर भाजपने आनंद भरोसे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून इरफानूर रहेमान खान, तर राष्ट्रवादीने महापौर प्रताप देशमुख यांना मैदानात उतरवले आहे. उपमहापौर सज्जू लाला ‘एमआयएम’चे उमेदवार आहेत. तर मनसेकडून विनोद दुधगावकर मैदानात होते. मात्र आता दुधगावकरांनी सज्जू लाला यांना रोखण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करून राहुल पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

Leave a Comment