ब्रिटीश पोलिसांनी जप्त केला इस्लामिक स्टेटचा निधी

police
लंडन – ब्रिटीश पोलिसांनी अतिरेकी संघटना इस्लामिक स्टेटचा निधी जप्त केला असल्याचे सूत्रांक़डून समजते. ब्रिटीश पोलिसांनी २,५०,००० पौंड्स म्हणजेच २ कोटी ४४ लाख ८८ हजार ४२४ रुपये जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद विरोधी पथकातील अधिका-यांनी सांगितले की, सर्वाधिक पैसे हे मॅंचेस्टर विमानतळावरुन तुर्कस्तानला जाणा-या प्रवाशांकडून मिळाले आहेत. पैसे घेऊन जाणा-या प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रवासी सिरीया आणि इराकमध्ये अतिरेकी संघटनेला पैसे पोहोचवण्यासाठी जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक माध्यमांच्या मते, ग्रेटर मॅंचेस्टर पोलिसांचे मुख्य गुप्तचर अधीक्षक टोनी मोल यांनी सांगितले की, संघर्षासाठी अतिरेक्यांना पैशाची गरज आहे. सिरीया आणि तुर्कस्तानच्या सीमेवर अशी अनेक दुकाने आहेत, जेथे शस्त्रास्त्रांची विक्री केली जाते. नॉर्थ वेस्ट काऊंटर टेरीरिझम युनिटचे प्रमुख मोल यांनी सांगितले की, आम्ही लोकांकडून पैसे जप्त केले आहेत. त्यामुळे त्यांना फक्त हत्यार खरेदीपासूनच नव्हे तर अतिरेकी संघटनेंना मदत पुरवण्यापासून रोखण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment