स्तनाचा कर्करोग वाढत आहे

cancer
महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे जगभर ऑक्टोबर महिन्यात स्तन कर्करोग जागृती मोहीम आखली जात आहे. भारतात तर दर २८ महिलांमागे एका महिलेत स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे दिसत आहेत. त्यातल्या त्यात शहरांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. शहरातील दर २२ महिलांमागे एका महिलेला हा विकार होत आहे. पाश्‍चिमात्य देशांमध्ये वय वर्षे ५३ ते ५७ या वयोगटात महिलांना कर्करोग होण्याची शक्यता असते. पण भारतात हाच वयोगट ४३ ते ४६ वर्षे असा झाला आहे. म्हणजे वयाच्या ४३ व्या वर्षांपासून ४६ व्या वर्षापर्यंत कोणत्याही क्षणी कर्करोग होऊ शकतो.

अमेरिकेमध्ये दर आठ महिलांमागे एक महिला स्तनाच्या कर्करोगाची बळी ठरू शकते. यावर्षी म्हणजे २०१४ या वर्षात एक ४० हजार महिला स्तनाच्या कर्करोगाने मरतील असे एका कर्करोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये हा धोका आणखी गंभीर आहे.

या विकारापासून सुटका कशी करून घेता येईल यावर या निमित्ताने जागृती केली जात आहे. कोणताही कर्करोग नेमका कसा होतो आणि का होतो, याचे निश्‍चित स्वरूपाचे कारण अजून तरी सापडलेले नाही. परंतु महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्यामागे वाढते वजन हा एक मुख्य घटक असल्याचे लक्षात आले आहे. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या ९२ हजार महिलांच्या पाहणीमध्ये हे आढळून आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment