योनेक्स डच ओपन ग्रांपी स्पर्धेचा खिताब जयरामने जिंकला

ajay
अममेयेर (नीदरलॅंड्स)- योनेक्स डच ओपन ग्रां पी स्पर्धेचा खिताब जिंकत भारतीय बॅडमिंटन खेळाडू अजय जयरामने आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठा विजय मिळविला आहे. बंगळुरुच्या २७ वर्षीय खेळाडूने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या इहसान मौलाना मुस्तफावर १०-११, ११-६,११-७,१-११,११-९ ने विजय मिळविला. जयरामने इंग्लंडच्या अव्वल मानांकीत राजीव ओसेफला मात देत, अंतिम सामन्यात स्थान मिळविले. दुखापतीमुळे सात महिने बाहेर राहिल्यानंतर ऑगस्टमध्ये पुनरागमन करणा-या १३ व्या मानांकीत जयरामने ओसेफला २६ मिनिटे झालेल्या उपांत्य सामन्यात ११-८,११-७,११-५ ने हरविले. अंतिम सामन्यात जयरामचा प्रवास खूप कठिण होता. त्याने उपांत्य पूर्व सामन्यात इंडोनेशियाच्या तिस-या मानांकीत डाइनोसियस हायोम रूंबाकाला हरविले, तर उप उपांत्य पूर्व सामन्यात हॉंगकॉंगच्या चुन हेर्इ तामला मात दिली होती.

Leave a Comment