बारावीचे अर्ज भरण्यास २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

hsc
पुणे – निवडणूका आणि दिवाळी यामुळे शिक्षकांवर आलेल्या अतिरिक्त ताणामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च २०१५ मध्ये होणार्‍या बारावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.नियमित शुल्क भरुन २१ ऑक्टोबरपर्यंत तर विलंब शुल्कासह आता ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. निवडूकांच्या कामामुळे शिक्षकांना शालेय कामे करण्यास वेळ लागत असल्याने ही तारीख वाढवून देण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आधी हे अर्ज भरण्याची तारीख १३ ऑक्टोबरपर्यंत होती. शिक्षकांना दिवाळीआधीच दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज हे ऑफलाइन भरुन घ्यायचे आहेत. त्यातच दिवाळी आणि निवडणूकांच्या कामामुळे शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडालेली पहायला मिळत होती.याच पार्श्वभूमीवर बोर्डाने हा निर्णय घेतल्याने अनेक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या याद्या व चलन भरुन ३१ ऑक्टोबरपर्यंत विभागीय शिक्षण मंडळाकडे जमा करावेत असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

Leave a Comment