दिवाळी सणा निमित्ताने विशेष गाड्यांचे आयोजन

indian-railway
मुंबई – दिवाळी सणा निमित्ताने मुंबई, पुणे, हावडा दरम्यान विशेष रेल्वे गाड्या प्रवाश्यांकरीता धावणार आहेत. दिवाळी सणामुळे प्रवाश्यांच्या संख्येत वाढत होताना दिसत आहे. याच कारणामुळे रेल्वे विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर ते मुंबईकरीता सुमारे ४ गाड्या धावणार आहे. या रेल्वे गाड्या १९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान धावणार आहेत. तसेच नागपूर ते पुणे या दरम्यान १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत ४ रेल्वे गाड्या धावणार आहेत. या रेल्वे सेवा दिवाळीच्या सणा निमित्ताने आयोजित करण्यात आल्या आहे. पुणे ते कामाख्या दरम्यान नागपूर येथून १६ साप्ताहिक जलद प्रीमियम उपासना विशेष रेल्वे सेवा मिळणार आहे. पुणे ते कामाख्या साप्ताहिक प्रीमियम जलद विशेष रेल्वे पुणे येथून २५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून १३ नोव्हेंबर पर्यंत धावणार आहे. कामाख्या ते पुणे साप्ताहिक प्रीमियम जलद २२ सप्टेंबर पासून रेल्वे गाडी धावत असून १० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. या गाड्या प्रवासा दरम्यान न्यू जलपाईगुडी, आसनसोल, राउलकेला, रायपूर, नागपूर आणि पनवेलमध्ये प्रवास थांबणार आहे. २० सप्टेंबर पासून साप्ताहिक प्रीमियम जलद विशेष रेल्वे धावत आहे. ही रेल्वे १८ नोव्हेंबर पर्यंत जयपूर ते मदुराई दरम्यान नागपूर येथून धावणार आहे. तसेच हीच रेल्वे गाडी मदुराई ते जयपूर प्रीमियम जलद विशेष रेल्वे २३ सप्टेंबर पासून धावत असून १८ नोव्हेंबर पर्यंत धावणार आहे. हि गाडी भोपाळ, नागपूर, विजयवाडा, चैन्नई आणि तिरूचिरापल्ली स्थानकावर थांबणार आहेत. मुंबई ते हटिया दरम्यान ८ विशेष रेल्वे धावणार आहेत. २१ ऑक्टोबर पासून ते १२ नोब्हेंबर पर्यंत या रेल्वे गाड्यांच्या सुविधा प्रवाशाना मिळणार आहे. ही रेल्वे गाडी दादर, कल्याण, इगतपूरी, भुसावल, अकोला, बडनेरा, वर्धा, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर आदि स्थानकांवर थांबणार आहे.