
बगदाद – इराकमधील विविध भागांत झालेल्या दहशतवादी बॉम्ब हल्ल्यात ३८ जण ठार झाले आहेत. यामध्ये दोन पोलीसांचा देखील समावेश आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्यात १४१ जण जखमी झाले आहेत. स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी दिलाय प्रांतात दुपारच्या दरम्यान विस्फोटक पदार्थांनी भरलेल्या दोन कारमध्ये पहिला स्फोट घडवून आणला. त्यानंतर एक-एक करुन विविध भागांत बॉम्ब हल्ले झाले.
दहशतवादी बॉम्ब हल्ल्यात ३८ ठार, १४१ जखमी
बगदादपासून १७५ किमी अंतरावरील कारा-तब्बा गावातील पोलीस मुख्यालयाच्या बाहेर एका हल्लेखोराने आत्मघाती बॉम्ब हल्ला घडवून आणला. दरम्यान अंबर प्रांतातील रामादी शहरातून जात असता पोलीसांचा एक ताफा बॉम्ब स्फोटात अडकला आणि यामध्ये एका पोलीस प्रमुखाचा मृत्यू झाला. यासह सलाहुद्दीन आणि धुलुइया प्रांतातील गावांत इस्लामिक स्टेट (आयसीसी) च्या आतंकवाद्याकडून घडवून आणलेल्या बॉम्ब हल्ल्यात अनेक जण ठार झाले तर काही जखमी झाले आहेत.
