इसिस आणि कुर्दीश सैन्यात झालेल्या चकमकीत २८ सैनिक ठार

isis
बगदाद – सिरीयाच्या सीमेजवळील कुर्दबहूल कोबानी शहरात इस्लामिक स्टेटचे अतिरेकी आणि कुर्दीश सैन्याच्या दरम्यान चकमक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चकमकीत २८ कुर्दीश सैनिक मारले गेल्याचे त्यांनी सांगितले. कोबानी सुरक्षा परिषदेच्या उपप्रमुखांच्या मते, रविवारी संध्याकाळपासूनच शहरातील पूर्व आणि दक्षिणपूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट केले जात आहेत. असे असले तरी या परिसरावर अद्यापपर्यंत कोणीही ताबा मिऴवलेला नाही, असे त्यांनी सांगितले. सिरीयाच्या मानवाधिकार संघटनेच्या मते, गेल्या काही दिवसात या परिसरात ३६ अतिरेकी मारले गेले आहेत. मृत अतिरेकी परदेशी असल्याचे सांगितले जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या मते, कोबानी शहर जर अतिरेक्यांच्या तावडीतून मुक्त झाले नाही तर येथे हजारो नागरिकांचा नरसंहार केला जाऊ शकतो. दरम्यान अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिका-यांनी सांगितले की, वॉशिंग्टन भविष्यात इराकी सेनेला देण्यात येणारी मदत वाढवू शकतो. इस्लामिक स्टेट संघटनेवर आतापर्यंत २०० पेक्षा जास्त हल्ले करण्यात आले आहेत.

Leave a Comment