इशा व आकाश अंबानी संचालक मंडळावर

isha
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची जुळी मुले इशा व आकाश यांना रिलायन्सच्या टेलिकॉम व रिटेल व्हेंचर कंपन्यांच्या संचालक मंडळावर घेतले गेल्याचे पत्रक कंपनीने प्रसिद्धीस दिले आहे. २३ वर्षीय इशा व आकाश रिलायन्स जिओ इन्फोकॉम व रिलायन्स रिटेल व्हेंचरच्या संचालकपदावर नेमले गेले आहेत.

इशाने २०१३ मध्ये येल विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर जागतिक कन्सल्टन्सी फर्म मेकेंझी मध्ये कांही काळ काम केले आहे तर आकाशने ब्राऊन विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर रिलायन्स फोर जी टेलिकॉम व्हेचरमध्ये काम सुरू केले होते. त्यांचे वडील मुकेश यांनी ज्या वयात रिलायन्स जॉईन केली त्याच वयात हे दोघेही कंपनीच्या संचालकपदावर आले आहेत.

Leave a Comment