प्रचाराच्या तोफा थंडावल्या- आता प्रतीक्षा मतदानाची

election
मुंबई – महाराष्ट्रात होत असलेल्या १५ आक्टोबरच्या विधानसभा मतदानासाठीचा प्रचार आज सायंकाळी संपत असून गेले १५ दिवस सर्वच राजकीय पक्षांनी डागलेल्या प्रचाराच्या तोफा आता थंडावत आहेत. हाताशी प्रचाराला कमी वेळ राहिल्याने बहुतेक पक्षांचे महत्त्वाचे नेते गेले दोन दिवस अव्याहत प्रचार करत होते. सर्वच पक्षांनी आपापली ताकद पणाला लावल्याचे दिसत होते. आता यापुढे कार्यकर्ते आणि उमेदवार
घरोघरी प्रचारावर भर देतील. रविवारी महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभा झाल्या.

मोदींनी राष्ट्रवादीला विजयी केले तर भ्रष्टाचार वाढेल असे पंढरपूरच्या सभेत सांगितले तर राहुल गांधी यांनी मोदींना विरोधी पक्ष नेते संबोधतानाच पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा करून मतदारांची करमणूक केली. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे याची कल्पना बहुतेक राहुल गांधी यांना नसावी असे समजते.

यंदाच्या निवडणुकीतही महत्त्वाच्या जागांवर विरोधी पक्षांच्या उमेदवारांशी मिळतीजुळती नांवे असलेले उमदेवार उमे करण्याची खेळी खेळली गेली आहे. त्यामुळे मतदारांच्यात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन चिन्हाचा उल्लेख उमेदवार वारंवार करताना दिसून आले. राष्ट्रवादीचे गोटीराम पवार, सेनेचे वामन म्हेत्रे,ऐरोलीत भाजपचे वैभव नाईक, सेनेचे विजय चौगुले. बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांच्या नावाशी साधम्य असलेले अपक्ष उमेदवार उभे केले गेले आहेत.

Leave a Comment