मतदानाची आठवण करुन देण्यासाठी आता जिल्हाधिका-यांचा संदेश

mobile
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतदेखील विक्रमी मतदान व्हावे, मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता निवडणूक आयोग प्रयत्नशील असून, मतदारांना वारंवार मतदानाच्या दिवसाची ते आठवण करुन देत आहेत. तसेच विविधप्रकारे मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरुकता पसरविण्याचे ते काम करत आहेत. विविध पोस्टर, जाहिराती यातून मतदारांना जागरुक केल्यानंतर आता निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचीदेखील कास धरली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिका-यांकडून मतदारांच्या भ्रमणध्वनीवर एक संदेश पाठवला जात असून, त्यात मतदानाच्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत अवश्य मतदान करा, असे सांगण्यात आले आहे. तसेच या संदेशात ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुमचे नाव मतदारयादीत आहे की नाही, ते तपासा, असे आवाहनदेखील कऱण्यात आले आहे.

Leave a Comment