
मुंबर्इ – आय लीग क्लब मुंबर्इ एफसी या फुटबॉल संघाने ब्राझिलचा स्ट्राइकर जोशिमात डी सिल्वा मार्टिसला आपल्या संघात सामिल केले आहे. या ३० वर्षीय फॉरवर्डने मोहम्मडन स्पोर्टिंगकडून २३ आय लीग सामन्यात १३ गोल केले आणि मागील सत्रात सर्वाधिक गोल करणा-या खेळाडूंमध्ये दुस-या स्थानावर राहिला. सिल्वाने सांगितले की, या क्लबसाठी खेळणे रोमांचित करणारे असेल. मुंबर्इ एफसीला हरविणे नेहमीच कठिण असते.
स्ट्राइकर जोशिमात डी सिल्वा मार्टिस ‘मुंबर्इ एफसी’ संघात सामिल
मला आपल्या सहका-यांसोबत मिळून क्लबला गुणतालिकेत अव्वल स्थानावर नेण्यास मदत करायची आहे. या क्लबमध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. मला मुंबर्इमध्ये खेळायला आवडते. हे सुंदर शहर आहे. येथील लोक उत्साही असतात. मी मुख्य प्रशिक्षक खालिद जामिल आणि व्यवस्थापक हैनरी पिकार्डोसोबत खेळण्यासाठी खूप उत्सूक आहे. मी आपल्या नव्या सहका-यांना भेटण्यासाठी देखील आतूर आहे, असेही तो पुढे म्हणाला.
