
नवी दिल्ली – हॉकी इंडिया लीग (एचआयएल) च्या पहिल्या दोन सत्रातील यशानंतर राज्यसभा खासदार आणि माजी मंत्री राजीव शुक्ला तिस-या आणि चौथ्या सत्रात देखील लीगच्या सल्लागार समितीचे सदस्य राहतील. माजी संसदीय कार्यमंत्री शुक्ला इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) चे अध्यक्ष देखील आहेत आणि यावर्षी ते पुन्हा एकदा एचआयएलमध्ये महत्वाची भुमिका पार पाडतील.
हॉकी इंडिया लीगमध्ये सल्लागार समितीच्या सदस्यपदी राजीव शुक्ला
शुक्ला यांनी सांगितले की, माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे आणि भारतात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील राहिल. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय हॉकीचा दम पुन्हा एकदा पहायला मिळेल आणि ही प्रत्येक भारतीयसाठी गौरवाची बाब आहे. या लीगच्या माध्यमातून आम्ही हॉकीला प्रोत्साहन देण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहोत. एचआयएलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र बत्रा यांनी सांगितले की, आम्ही राजीव शुक्ला यांच्यासोबत काम करण्यास उत्सूक आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की, ते बोर्डमध्ये आपल्या चांगल्या कामाला कायम ठेवतील ज्यामुळे लीगला यशस्वी बनविण्यात त्यांची खूप मदत होर्इल. हिरो हॉकी इंडिया लीग आपल्या नव्या व्यापाराच्या रणनितीमुळे नवे यश प्राप्त करेल, असेही ते पुढे म्हणाले.
