सुभाष देशमुखांच्या ४ हजार मुली जावई करताहेत प्रचार

deshmukh
सोलापूर- विधानसभा मतदानाचा दिवस आता अगदी नजीक आल्यामुळे प्रचाराला सर्वत्रच चांगलाच जोर आला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणक रिंगणात भाजपतर्फे उतरलेले सुभाष देशमुख यांचाही प्रचार जोरात सुरू असून त्यांच्या प्रचारात त्यांच्या ४ हजार मुली जावई प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळताता दिसत आहेत. अन्य कार्यकर्त्यांच्या बरोबरीनेच हे जावईमुली प्रचारात गुंतले आहेत.

गेली कांही वर्षे सुभाष देशमुख आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी लोकमंगल ग्रुप चालवित असून त्यात उपवर मुलामुलींची लग्ने सार्वजनिक विवाहसोहळ्याच्या माध्यमातून केली जात आहेत. गेल्या सात वर्षात देशमुख यांनी अशा प्रकारे २ हजार मुलींचे कन्यादान केले आहे. याच मुली आणि जावई आता देशमुखांचा प्रचार करत आहेत.

देशमुख म्हणाले की मुलीचे लग्न पित्यासाठी अभिमानाची बाब. मात्र आर्थिक दुर्बल घटकांसाठी ती समस्या ठरते. अनेकवेळा हुंड्यासाठी सावकारांकडून कर्ज घेणे, जमिनी विकणे असे प्रकार करून मुलीचे हात पिवळे केले जातात. हे घडू नये म्हणून आम्ही सार्वजनिक विवाह सोहळे आयोजित करण्याचे सुरू केले आणि त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरवर्षी असा सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्यातून विवाह झालेल्या जोडप्याला मुलगी झाली तर तिच्यासाठी ५ हजार रूपये दिले जातात आणि मुलीच्या १८ व्या वर्षी ही ठेव व्याजासह मुलीला दिली जाते. गेल्या सात वर्षात आम्ही या माध्यमातून २ हजारांवर विवाह लावून दिले आहेत.

Leave a Comment