इसिसविरोधातील कारवाई अमेरिकेला झाली डोईजड

plane
इराक आणि सिरीयातील आयएसआयएस म्हणजेच इसिस दहशतवाद्यांनी कब्जात घेतलेल्या भूभागावर आणि कुर्द व इराकी फौजांना मदत म्हणून गेले ६० दिवस अमेरिका या भागात हवाई हल्ले करत आहे. मात्र दिवसेदिवस हे हल्ले आणि त्याचा खर्च अमेरिकेला डोईजड होऊ लागल्याचे वॉशिग्टन सेंटर फॉर स्ट्रॅटिजिक अॅन्ड बजेटरी असेसमेंट विभागाच्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.

या विभागाचे थिक टँक मेंबर टोड हॅरिसन यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका जे हवाई हल्ले करत आहे त्यात आत्तापर्यंत इस्लामिक स्टेटचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत, त्यांचे २ टँक, बुलडोझर नष्ट झाले आहेत आणि सहा ठिकाणच्या त्यांच्या फायरिंग पोस्ट उद्धस्त झाल्या आहेत. एकूण हिशोब केला तर हे नुकसान १५० कोटी रूपयांच्या दरम्यान आहे. मात्र त्या तुलनेने हल्यांसाठी येत असलेला खर्च विचारात घेतला तर एका हवाई हल्ल्यासाठी अमेरिकेला ३ कोटी रूपये खर्च करावा लागत आहे. या हल्ल्यांसाठी वापरण्यात येत असलेल्या एफ १५,१६,१७ विमानांचा तासाचा उड्डाण खर्च ९ ते२० हजार डॉलर्स दरम्यान आहे. त्यात गुप्तचर खर्च, टोहो टेहळणी विमानांचा खर्च अंतर्भूत नाही.

अमेरिकेने या भागात आत्तापर्यंत ५० टॉम हॉक मिसाईल वापरली आहेत.या जातीच्या एका मिसाईलचा खर्च १० कोटी रूपये येत आहे. शिवाय अन्य मिसाईल वापरली जात आहेतच. आत्तापर्यंत या हल्ल्यांसाठी ७ अब्ज डॉलर्स खर्च झाला असून रोजचा खर्च ७५ लाख डॉलर्स आहे.

Leave a Comment