आवडत्या वाहन क्रमांकाच्या ऑनलाइन लिलावाची जोरदार चर्चा

no
नवी दिल्ली – आवडत्या वाहन क्रमांकाचा ऑनलाइन लिलाव सध्या जोरदार चर्चेत आहे. तीन दिवसांपासून चालत असलेल्या या लिलावात ०००१ या क्रमांकावर सर्वाधीक १२.०५ लाख रुपयांची किंमत सांगण्यात आली. तर ०००९ या क्रमांकाला ८.२५ लाख रुपयाला विकण्यात आले. याप्रकारे इतर आवडत्या वाहन क्रमांकासाठी वाहन मालकांनी लिलावाची सर्वाधीक किंमत लावली. दिल्ली वाहतूक विभागाकडून चारचाकी वाहनांसाठी सुरु करण्यात आलेल्या लीलावाच्या पहिल्याच टप्प्यात लीलावासाठी सर्वाधीक किंमत लावण्यात आली. आपल्या आवडीचा वाहन क्रमांक मिळावा म्हणून तीन दिवसात एकूण ३२ वाहनमालकांकडून लीलाव किंमत लावण्यात आले. सर्वाधीक किंमत लावणा-या एकूण २९ वाहनमालकांना त्यांचा आवडता वाहन क्रमांक लागू करण्यात आला आहे.

Leave a Comment