अमळनेरमध्ये ८० लाख, तर सांगलीत ५ लाख जप्त

note
अमळनेर – निवडणूकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप केले जाते. त्या अंतर्गत अनेक ठिकाणी लाखो, करोडो रुपये जप्त केले जात आहेत. अमळनेरमध्ये विप्रो रस्ता येथे ८० लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पाटील प्लाझामध्ये तीन बॅगांमध्ये ही रक्कम सापडली. जगदीश मधुकर चौधरी (रा. नंदुरबार) योगेश भिका चौधरी (रा. नंदुरबार) यांच्याकडील रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. निवडणूक भरारी पथकाने केलेल्या कारवाईत नंदुरबारच्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ही रक्कम कुठून आली याबाबत दोघेही जण कागदपत्र दाखवू शकले नाहीत. याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, सांगलीतील विटामध्ये ५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका कारमध्ये ही तसेच सांगलीत ५ लाखांची रक्कम सापडली. ही कार मिथून सगरे यांची असून याप्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment