इसिसविरोधातील निदर्शनात २४ ठार

turkey
अंकारा – तुर्कस्तानात इस्लामिक स्टेट अतिरेकी संघटनेविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान आतापर्यंत २४ नागरिक मारले गेले आहेत. तर १४५ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या निदर्शनांदरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक दक्षिण पूर्व प्रांतातील नागरिक आहेत. तुर्कस्तान सरकारने परिसरात संचारबंदी लागू केली होती. हिंसाचार कमी झाल्यानंतर परिसरातील संचारबंदी अंशतः हटविण्यात आली आहे. तुर्कस्तानचे राष्ट्रपती रिसेप तैय्यिप एडरेगन यांनी निवेदन जारी करुन सांगितले की, निदर्शकांचे लक्ष्य फुटीरवादी कुर्द आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या शांतीप्रक्रियेला नुकसान पोहोचवणे हे आहे.

Leave a Comment