
नगर : माजी विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना टोला लगावत भाजपा आणि काँग्रेस सोडले तर अन्य प्रादेशिक पक्षातील नेते गल्लीपुरतेचा मर्यादीत असल्याचे वक्तव्य भाजपा उमेदवारांसाठी अहमदनगर येथे आयोजित सभेत केले.
पवार, ठाकरे बंधू आहेत गल्लीतले नेते : खडसे
राज्यातील भ्रष्ट आघाडी सरकार सत्तेवरून खाली खेचण्याला आमचे प्राधान्य आहे. मुख्यमंत्री कोण होणार हा विषय आमच्यादृष्टीने महत्वाचा नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते असल्यामुळे निवडणूक प्रचारासाठी ते महाष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. त्यात गैर काय, असा सवाल करीत खडसे म्हणाले, मोदी आणि भाजपाच्या नावाने कितीही गळा काढला तरी त्याचा आमच्यावर काहीही फरक पडणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे प्रादेशिक पक्ष असून, त्यांचे नेते गल्लीपुरते मर्यादीत असल्याचा सणसणीत टोला खडसे यांनी पवार आणि ठाकरे बंधुंना लगावला.
