कामाच हिशेब मागितला तर राग येण्याचे कारण काय : सोनिया गांधी

sonia
कोल्हापूर : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपाने देशातील भोळयाभाबडया जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांची घोर फसवणूक झाली केली असून कामाच हिशेब मागितला तर राग येण्याचे कारण काय, असा खडा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. पहिल्यापासून महाराष्ट्र हा गुजरातच्या पुढे असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

कोल्हापूर येथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. भाजपा आणि शिवसेना हे संधीसाधू पक्ष असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन करतानाच या दोन्ही पक्षांनी समाजात फुट पाडण्याचेच काम केल्याचा आरोप गांधी यांनी केला. युपीएच्या काळातील योजनांची नावे बदलून त्या नव्याने सादर करण्याचे काम सध्याचे मोदी सरकार करीत आहे. मुखवटे बदलून मते मागण्यासाठी येणाऱया भाजपापासून सावध रहा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईतील अनेक महत्वाच्या संस्थांची कार्यालये गुजरातला हलविण्यामागे भाजपाचे मोठे षडयंत्र आहे. सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारने महाराष्ट्राच्या बाबतीत अनेक चुकीचे निर्णय घेतल्याचा घणाघातही त्यांनी या वेळी केला.