कोणत्याही क्षणी कोबानी शहरावर इसिसचा कब्जा

kobala
बेरूत – सिरीयातील सीमावर्ती भागात असलेल्या कोबानी या कुर्दिश शहरावर कोणत्याही क्षणी इस्लामिक स्टेटचे सुन्नी दहशतवादी कब्जा करण्याची शक्यता असल्याचे तुर्कस्तानचे राष्ट्रपती तईम इडेगिना यांनी जाहीर केले आहे. गेले तीन आठवडे सतत या शहरावर इसिसकडून हल्ले होत असून सुन्नी दहशतवादी शहराच्या सीमेबाहेर आले आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहरातील ४०० लोक ठार झाले असून लक्षावधी लोकांनी जिवाच्या भीतीने पलायन केले आहे.

तुर्कस्तानवर या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे मात्र तुर्कस्तानने अमेरिकेचे हवाई हल्ले आणखी तीव्र करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींच्या मते अमेरिकेकडून दहशतवाद्यांवर केले जात असलेले हवाई हल्ले फारसे प्रभावी ठरलेले नाहीत. नुसत्या हवाई हल्ल्यांनी या दहशतवाद्यांना संपविणे शक्य नाही त्यामुळे अधिक संख्येने हल्ले केले गेले पाहिजेत. दरम्यान सिरीयातून पळून गेलेले नागरिक तुर्कस्तानातच आश्रयाला येत असल्याने देशावर निर्वासितांचा मोठा बोजा पडत असल्याचेही राष्ट्रपतींचे म्हणणे आहे.

Leave a Comment