राहुल गांधी आज महाडमध्ये, सोनिया गांधी उद्या कोल्हापूरला

combo
मुंबई – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रचारसभांचा झंझावात आजपासून राज्यात सुरू होत असून आज महाड येथे त्यांची पहिली जाहीर सभा होईल.

या सभेनंतर लातूर जिल्ह्यातील औसा येथे दुपारी साडेतीन वाजता ते सभा घेतील. राज्यातील प्रत्येक विभागात गांधी यांची किमान एक सभा घेतली जाणार आहे.

या सभेमुळे राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राहुल गांधी यांच्या सभांचा धडाका राज्यात सुरू होणार आहे. या वेळी काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे कॉँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौ-यावर येणार आहेत. कोल्हापूरच्या गांधी मैदानात त्यांची पहिली प्रचारसभा दुपारी १२.३० वाजता होणार आहे. तर औरंगाबादच्या आम खास ग्राउंडवर दुपारी ३.३० वाजता त्यांची दुसरी सभा होईल. या दोन्ही सभांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.