चीनमध्ये ६.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप

earthquake
जिंगू – मंगळवारी रात्री उशीरा चीनच्या युनान प्रांतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या भुकंपात एक जण ठार झाला असून सुमारे ३०० हून अधिक नागरिक जखमी आहेत. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जण ठार झाले आहेत.

स्थानिक वेळेनुसार रात्री ९.४९ वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. यूनाइटेड स्टेट जियॉलॉजिकल सर्व्हीसने दिलेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर भुकंपाची तीव्रता ६.४ एवढी होती. भूकंपाचे केंद्र यूनिजिन्घॉन्गहून १६३ किलोमीटर अंतरावर जमिनीखाली १० किलोमीटरवर होते. भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान जिन्ग्गू कौंटी आणि लिकेंग शहरात झाले आहे.

स्थानिक अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार जिंगू कौंटीमध्ये ९२,००० नागरिकांना भूकंपाचा फटका बसला आहे. येथून सुमारे ५६,८८० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हजारो घरांचेही या भूकंपात मोठे नुकसान झाले आहे. तसेच परिसरात वीज आणि दूरसंचार व्यवस्थाही ठप्प झाली आहे.

Leave a Comment