इसिसविरोधातील निदर्शनांना हिंसक वळण

turkey
इस्तांबूल – सिरीयातील कोबानी शहर इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांपासून वाचवण्याची मागणी करण्यासाठी सुरू असलेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे. या निदर्शनांदरम्यान कुर्दीश समुदाय आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत किमान १४ नागरिक मारले गेले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहेत, असे संबंधित सूत्रांकडून समजते. पोलिसांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिणपूर्वेकडील शहर दियारबाकीर येथे सर्वाधिक पाच नागरिक मारले गेले आहेत. नाटोचे सदस्य असलेल्या तुर्कस्तान या देशात १ लाख ८० हजारपेक्षा जास्त कुर्दीश नागरिकांनी आश्रय घेतला आहे. मात्र त्यांनी अद्यापही इस्लामिक स्टेट विरोधातील कारवाईत अमेरिकेला साथ दिलेली नाही.

Leave a Comment