अमेरिकेने केला १४ अतिरेक्यांचा

drone
पेशावर – पाकिस्तानच्या अशांत अशा उत्तर वजरीस्तानातील आदिवासी बहूल प्रांतात आज अमेरिकेने ड्रोन हल्ले केले. तालिबानी अतिरेकी लपलेल्या संशयित तळांना लक्ष्य करत करण्यात आलेल्या या ड्रोन हल्ल्यात १४ अतिरेकी मारले गेले आहेत. गेल्या २४ तासांत अमेरिकेने तिस-यांदा हे ड्रोन हल्ले केले आहेत. सुरक्षा अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने आज ड्रोन हल्ल्यांदरम्यान एका घराला आणि वाहनाला लक्ष्य केले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर वजरीस्तानातील दत्ताखेळ परिसरात पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेजवळ करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात आठजण मारले गेले आहेत. दुस-या ड्रोन हल्ल्यात सहाजण मारले गेले आहेत. तर अन्य ११ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानने या हल्ल्यांना सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले असून, या हल्ल्यांची कठोर शब्दात निंदा केली आहे.

Leave a Comment