
सोलापूर – शिर्डीहून पंढरपूरला येणारी आंध्रप्रदेशमधील खाजगी लक्झरी बस पुलावरून खाली कोसळल्याने आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघतात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत. करमाळा-टेंभूर्णी रस्त्यावरील कविट गावाजवळ पुलाचा कठडा तोडून ही बस खाली कोसळली. या बसमध्ये ४२ प्रवासी होते. यातील आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. ए.पी-२१ एक्स- ०४०८ असा या अपघाती बसचा नंबर आहे. बसमधील सर्वच्या सर्व प्रवासी आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. अपघाताची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
