मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी हा केवळ सेनेचा अपप्रचार !

combo
महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला बहुमत न मिळता भाजपची सरशी झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्यांच्या आशीर्वादाने तसेचप्रत्यक्षाप्रत्यक्ष सहकार्याने गुजरात्यांचे प्राबल्य होईल आणि परिणामी कालांतराने मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यात येईल असा प्रचार शिवसेनेकडून सध्या करण्यात येत आहे. तो जसा उघडपणे करण्यात येत आहे तसा कुजबूजीच्या स्वरूपातही करण्यात येत आहे. दुसऱ्याप्रकारचा प्रचार कौशल्याने अधिक द्वेषकारक करता येऊ शकतो. तसे होणे केवळ भाजपच्या अहिताचे आहे असे नाही तर एकंदर महाराष्ट्रातील वातावरण कलुषित, असमंजसपणाचे आणि स्नेहाचा अभाव असलेले होण्याचा धोका आहे. तसे झाले तर महाराष्ट्राच्या प्रगतीवर आणि भारताच्या एकात्मतेवर त्याचा वाईटपरिणाम होण्याची भीती आहे. हे राष्ट्रीय संकट समजून ते टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

महाराष्ट्र आणि गुजरातचे ऐतिहासिक संबंध, मोदी आणि शहा ह्यांची संस्कारित पार्श्वभूमी आणि शिवसेनेचे कार्यकर्तृत्व ह्यांचा चिकित्सकआढावा त्यासाठीघ्यावा लागेल.आम्ही महाराष्ट्राला आमचामोठा भाऊ मानतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्यामागे मोठा अर्थ आणि परंपरा उभी असते. इस्लामी आक्रमकांकडून गुजरातमधीलहिंदू मुलींचे मोठ्या प्रमाणावर अपहरण होऊ लागले तेव्हा तेथीलहिंदू राजांनी पुण्यात पेशव्यांकडे साहाय्याची याचना केली. लगोलग शाहू छत्रपतींचे प्रतिनिधी म्हणूनपेशव्यांनी सरदार दाभाड्यांची गुजरातला ससैन्य आणि निश्चित उद्दिष्ट देऊनपाठवणी केली. त्यांनीतेथे तलवारीचा धाक दाखवून अभय निर्माण केले. गुजरातमधील हिंदू स्त्री इस्लामी बलात्काराच्या भीतीतूनमुक्त केली. दाभाड्यानंतर तेथे गायकवाड गेले आणि त्यांनी तेथे मराठी माणसाची नव्हे तर मराठी-गुजराती सहजीवनाची उत्कृष्ठ राजवट निर्माण केली. सयाजीराव महाराजांचे वडोदरा संस्थान म्हणजे विसाव्या शतकातील पहिल्या अर्ध्या भागात, पुरोगामी, स्वतंत्रताप्रियआणि कलासक्त राजवट म्हणून ओळखली जात असे. योगी अरविन्दान्पासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतअनेकानेक विभूतींच्या सहवासाचा आणि समादेशाचा लाभ ह्या संस्थानाने करून घेतला. गायकवाडांनी गुजराती अस्मितेला किंचितही उणेपणा येऊ दिला नाही उलट तिच्या मागे सदैवमराठी सामर्थ्य उभे केले आणि तिला तेजस्वीतेची जोड दिली. संयुक्त महाराष्टाच्या चळवळीचा काहीसाअपवाद सोडला तर मराठी विरुध्द गुजराती असा गंभीर संघर्ष एरव्ही उभा राहिल्याचे आठवत नाही. संयुक्त महाराष्ट स्थापनेच्या वेळी जो संघर्ष झालेला दिसतो त्याची कारणे वेगळी आहेत. ज्या कारणांसाठी बेळगाव, कारवार आणि गोवा महाराष्ट्राला देण्यात आला नाही त्याच कारणासाठी मुंबई महाराष्ट्राला देण्यास नेहरूंचा विरोध होता. महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि आर्थिकदृष्ट्यासंपन्न झाला तरभारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशाला तोडीसतोड असे नवे समीकरण निर्माण होईल अशी भीती नेहरूंना वाटत होती. सगळ्यांना हे माहीत आहे त्यामुळेशिवसेनेलाही ते माहीत असायला हवे अशी अपेक्षा करायला कोणाची आडकाठी नसावी कीनरेंद्र मोदीहे नेहरूंचे वारसदार नाहीत. नेहरूंच्या कॉंग्रेसपासून भारताला मुक्त करण्याची शपथ त्यांनी घेतली आहे. मोदीहे सरदार वल्लभभाईपटेलांच्या नेतृत्वगुणांवरविश्वास ठेवणारे पंतप्रधान आहेत. ते पटेलांना आदर्श मानतात आणि पटेलांची प्रेरक स्मृती जागती ठेवण्याच्याअनेक महत्वाकांक्षी योजना त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असतांनामार्गाला लावल्या आहेत. कॉंग्रेसने नेहरूंच्या तुलनेत पटेलांना उपेक्षेने मारले असेल पण ती लागण महाराष्ट्रातील कोणत्याही हिंदुत्ववादी पक्षाला लागता कामा नये.

वल्लभभाई पटेलांनी जोडण्याचे काम केले; तोडण्याचे नव्हे. त्यांनी पाचशेहून अधिक लहानमोठ्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्याचे ऐतिहासिक महत्वाचे काम केले. तीक्षण दृष्टीच्या धाकाने त्यांनी निजामाला वाकविले आणि पाकिस्तानात सामील होण्याचा हट्टसोडायला लावून हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करायला लावले. काश्मीर प्रश्ननेहरूंनी हेतुत: पटेलांच्या स्वाधीन केला नाही म्हणून त्याचे विलीनीकरण ही आपली सगळ्यातमोठीडोकेदुखी होऊन बसली आहे.

गझनीच्या महमदाने अनेकवेळा धार्मिक आणि राजकीय कर्तव्य म्हणून मोडून काढलेले प्रभास पट्टणच्यासोरटी सोमनाथाचे मंदिर वल्लभभाई पटेलांनी भारत स्वतंत्र होताचपुन्हा बांधून काढले. हि पुन्हा बांधून काढण्याची कल्पना काका गाडगीळांची आणि कन्हैय्यालाल मुन्शींची. म्हणजे मराठी आणि गुजराती माणसांची संयुक्त योजना. तीपटेलांपर्यंत पोचल्यावर त्यांनी त्यात पूर्ण लक्ष घातले आणि नेहरूंनी कितीही विरोध केला तरी त्याकडे लक्ष न देता त्यांनी ते बांधून दाखविले. पटेल असे जोडणारे होते. त्यांनी जे मंदिर बांधले त्यातील देवांची प्राणप्रतिष्ठा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्री जोशी ह्यांनी मुख्य पुरोहित म्हणून केली. तो क्षण राष्ट्रीय पुनरुत्थानाचा होता असे उद्गार राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद ह्यांनी काढले. मोदीह्या परम्परेचे आहेत. जे अन्यायाने पाडले गेले आहे ते पुन्हा मानाने उभे करावे, एकेक समाजघटक मोठ्या आशयाशी जोडावा आणि राष्ट्रीय पुनरुत्थान करावे हा त्यांचा ध्यास आहे. शरद पवारांचे शिवसेनेतील पगारी सेवक काही सांगोत, उद्धव ठाकरे ह्यांनी त्यांना कानाला लागू देऊ नये आणि मोदींवर अन्याय करू नये .

आता मोदीआणि शहा जेथून आले त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरा पाहू. हिंदुत्वाचा अनुशासनबध्द आणि संघटीत प्रसार करण्यासाठी नागपूरहून प्रचारकांच्या पलटणीच्या पलटणी देशभर रवाना झाल्या. बहुतेक प्रचारक मराठी होते. रानडे, परमार्थ, पेंढारकर, जोशी, मुळ्ये, देशपांडे, कळंबी, ठेंगडी, देवरस, देशमुख गोडबोले, पिंगळे अशी त्यांची नावे होती. त्यांना जेथे जा म्हणून सांगितले त्या प्रदेशात हिंदुत्व प्रचारासाठी त्यांनी आपलेआयुष्य खर्च केले. मागे वळून बघितले नाही. भास्करराव कळंबीनी शिवाजी महाराजांचे चरित्र सांगत केरळमध्ये संघ बांधला. आज भारतात ज्या लहानमोठ्या हिंदुत्ववादी संघटना काम करीत आहेत त्यांचा मूलस्त्रोत संघ आहे आणि हा संघ मराठी तरुणांनी बांधला आहे. त्यांच्या निस्पृहतेला चिकाटीला, धैर्याला आणि ध्येयवादापुढे जीवित तृणवत मानण्याच्या वृत्तीला निदान महाराष्ट्राने आणि त्यातल्या शिवसेनेने कमी लेखू नये. ही माणसे जोडणारी आहेत. तोडणारी नाहीत.

आसाममध्ये संघाचे प्रदीर्घ काळ प्रचारक होते त्यांचे नाव आहे मधू लिमये. ते आता नव्वदीच्या घरात आहेत आणि दादरला राहतात. दादरला नुसत्या लाटा मोजत बसून उपयोगाचे नाही. तर संघाने उभी केलेली सागरासारख्या अथांग खोलीची आणि विशाल हृदयाची माणसेही पाहण्याची सवय हवी. वर हैद्राबादचा उल्लेख झाला आहे म्हणून सांगतो की निजामाच्या शोषक आणि पीडक राजवटीपासून बहुसंख्यहिंदू प्रजेला सोडविण्यासाठी सावरकरांनी निशस्त्र प्रतिकाराचा संघर्ष केल. त्यात ज्या हजारोहिंदुत्वनिष्ठांनी कारावास भोगला त्यात एक होते लक्ष्मणराव इनामदार. आपल्या नरेंद्र मोदींना संघात ह्या इनामदारांनी घडविले आहे.

मोदी मुंबई महाराष्ट्रापासून तोडतील कसे ? तसे विचार मनात आणणेही चूक आहे. नेहरूंच्या कॉंग्रेसने मुंबईची लुटालूट केली. आज मुंबई दाउद इब्राहिमची आणि गुन्हेगारांची आश्रयभूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ह्या नगरीची मूळ देवता जी मुंबादेवी ती विस्मृतीच्या गर्तेत फेकली गेली आहे. मोदीतिची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करतील. मुंबईचे बकालपण घालविणे म्हणजे मुंबादेवीच्या भक्तांच्या शरीरात प्राण फुन्कण्यासारखे होणार आहे. मुंबईचा समतोल विकास करण्याचे डोळस व्रत मोदीमहाराष्ट्राच्या नव्या राज्यकर्त्यांना घ्यायला लावतील.मोदीखरेच असे परिवर्तन करू शकतील ह्याची भाजपविरोधकांना निश्चिती आहे. त्यामुळे त्यांची दलाली बुडून त्यांना विपन्नावस्था येणार आहे. म्हणूनमोदी आणि भाजप ह्यांचेविरुध्द कंड्या पिकाविण्याचा उद्योग त्यांनी सुरु केला आहे.

Leave a Comment