अमेरिकेन अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे सोने खरेदीदारांना आले ‘अच्छे दिन’

gold
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीने मागील १५ महिन्यांचा निच्चांकी स्तर गाठल्याने सणासुदीच्या काळात सोने खरेदीदारांना ‘अच्छे दिन…’ आले असल्याचे चित्र दिसत आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मौल्यवान धातू असलेल्या सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे सोने, चांदी आणि प्लॅटिनम या तिन्ही मौल्यवान धातूंचे दर घसरले आहेत. प्लॅटिनमचा सध्याचा दर त्याच्या २००९ साली असलेल्या दराइतका असून चांदी देखील २०१० साली असलेल्या दरापर्यंत खाली घसरले आहे. हॉंगकॉंगमधील आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर ०.२७ टक्क्यांच्या घसरणीसह ११८७.४५ डॉलर प्रति औंसच्या स्तरावर पोहोचला. भारतात आज सोन्याच्या दरात ४९० रुपयांची घसरण नोंदविण्यात आल्याने प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना २६,५११ रुपये मोजावे लागत होते. तर चांदीच्या दरात देखील ८१४ रुपयांची घसरण झाल्याने एक किलो चांदीचा दर ३७,८८८ रुपयांवर पोहोचला आहे.

Leave a Comment