नाशिकच्या अपक्षाचा अनोखा प्रचार

nashik
नाशिक – राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघम सुरू वाजत असतांना जो तो स्वत:ची प्रसिद्धी करण्याबरोबरच विरोधकांवर टिका करण्याची संधी सोडत नाही. त्यात अपक्ष उमेदवार मात्र आपापल्या परीने नवनवीन कल्पना लढवत आहेत. नाशिकच्या एका उमेदवाराने प्रचारासाठी अनोखा मार्ग शोधला आहे. प्रकाश कानोजे असे या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. कानोजे यांनी पत्नीचे मंगळसूत्र आणि स्वत:ची अंगठी गहाण ठेवून निवडणूक लढवत आहेत. निवडणूकीच्या प्रचारासाठी कानोजे यांनी आपल्या दुचाकीवर एक साउंड सिस्टीम लावली आणि नारळ हे प्रचार चिन्ह उभे केले आहे. जाहीरनामा आणि देशभक्तीपर गाणी वाजवत नाक्या-नाक्यावर प्रचार करणारे कानोजे मतदानाबाबत जागृती करत आहेत. एकीकडे इतर उमेदवारांनी उडवलेली प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे कानोजेंनी `एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

Leave a Comment