
नागपूर – विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात २४ सभा घेतल्या आहेत. त्यातील पाच सभा विदर्भात निश्चित करण्यात आल्या आहेत. यातील एक सभा गोंदिया येथे पार पडली. तर दोन सभा मंगळवारी खामगाव आणि नागपूर येथे होणार आहेत. धामणगाव आणि ब्रम्हपूरी येथील सभांच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी आज दिली. नागपूरची सभा मंगळवारी दुपारी ४ वाजता नागपूरच्या कस्तूरचंदपार्क मैदानावर आयोजित करण्यात आली असून या सभेत पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, रिपाईचे नेते रामदास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भाजपचे नागपूर जिल्ह्यातील सर्व उमेदवार उपस्थित राहतील असे व्यास यांनी सांगितले.
