चीन ओपन : जोकोविचने पाचव्यांदा तर, शारापोवाने पहिल्यांदा खिताब जिंकला !

tennis
बिजिंग – अव्वल मानांकीत सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविचने आपला दबदबा कायम ठेवत सलग तिस-यांदा आणि एकूण पाचव्यांदा चीन ओपनचा खिताब जिंकला आहे. जोकोविचने बिजिंगच्या राष्ट्रीय टेनिस स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डिखला सरळ सेटमध्ये ६-०, ६-२ ने हरविले. याआधी महिला एकेरी वर्गातील अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्वितोवाला मात देत, रशियाची अव्वल मानांकीत खेळाडू मारिया शारापोवाने आपला पहिला चीन ओपनचा खिताब जिंकला आहे. यंदाच्या वर्षातील शारापोवाचा हा चौथा डब्ल्यूटीए खिताब आहे आणि या विजयासोबतच ती जागतिक क्रमावरीत दुस-या स्थानावर पोहोचली आहे.

सामन्यापूर्वी शारापोवा जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर होती. तर, क्वितोवा तिस-या स्थानावर आहे. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या शारापोवाने एकही सेट न गमाविता अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला. विंबल्डन विजेत्या क्वितोवाने असे असूनही, अंतिम सामन्यात तिला कडवी झुंज दिली. शारापोवा दोन तास २८ मिनिटापर्यंत झालेल्या संघर्षपूर्ण सामन्यात ६-४, २-६, ६-३ ने जिंकली. क्वितोवाने पहिला सेट गमाविल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत, शारापोवाला दुस-या सेटमध्ये मात दिली. शारापोवाने तिस-या आणि निर्णायक सेटमध्ये विजय नोंदवत सामन्यावर कब्जा केला. पुरुष एकेरी वर्गातील सध्याचा विजेत्या जाकोविचला माजी विजेता बर्डिखला हरविण्यासाठी जास्त झुंजावे लागले नाही. जोकोविचने एक तास सहा मिनिटात बर्डिखला हरविले.

Leave a Comment