दिवाळीनिमित्त बीएसएनएलची फुल टॉकटाईम ऑफर !

bsnl
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी ‘बीएसएनएल’ने दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर देऊ केल्या आहे. त्यापैकी एक ऑफर म्हणजे कंपनीने व्हिडिओ कॉल्सचे दर हे व्हॉइस कॉलच्या बरोबरीने केले आहे. त्याचबरोबर टॉप अप रिचार्जवर फुल टॉकटाइम देण्यात येणार आहे. कंपनीने व्हिडिओ कॉलची ऑफर २० सप्टेंबरपासून सुरू केली आहे. फक्त ९० दिवसांकरिता या सेवेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.उत्सवाचे दिवस लक्षात घेऊन बीएसएनएलने मोबाइलच्या व्हॉइस कॉलच्या दराप्रमाणे व्हिडिओ कॉलचे दर कमी केल्यामुळे ग्राहकांना याचा आनंद घेता येईल, असे बीएसएनएलचे बोर्ड निर्देशक (सीएम) अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले. या प्लानमध्ये फक्त व्हिडिओ कॉलचे दर कमी केल्याचे कंपनीने सांगितले आहे. या व्यतिरिक्त कंपनीने १००, १५०, २५०, ३५० रुपयांच्या टॉपअप रिचार्जवर फुल टॉक टाइमवर देखील ऑफर दिली आहे. त्याचबरोबर ५५० रुपयांच्या रिचार्जवर कंपनीने ५७५ रुपयेआणि ७५० रुपयांच्या रिचार्जवर ७९० रुपयांचा टॉकटाइम देणार आहे.

Leave a Comment