मोदींनी केले हॉकी संघाचे अभिनंदन

modi1
नवी दिल्ली – आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवणा-या भारतीय पुरुष हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूस दोन लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस हॉकी इंडियाने जाहीर केले असून हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकणा-या भारतीय संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. आज दिवसभरात हॉकीसह महिलांच्या रिलेमध्ये भारताने सुवर्णपदक मिळवले. मोदींनी या रिले संघाचे त्याच बरोबर कबड्डी संघाचे देखील अभिनंदन केले आहे. आशियाई स्पर्धेत पदक मिळवलेल्या प्रत्येक खेळाडूमुळे भारतीयांची मान उंचावल्याचे मोदींनी म्हटले आहे.

तब्बल १६ वर्षानंतर पाकिस्तावर पेनाल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकावर भारताच्या पुरुष हॉकी संघाने नाव कोरले. हॉकी इंडियाने खेळांडूसह प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांनाही दोन लाख ५० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. तर सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा हॉकी इंडियाने केली आहे.

Leave a Comment