डोळ्यांच्या साथीचे मुंबईत थैमान

eyes
मुंबई – उन्हाचे चटके आणि पावसाणे हैराण झालेल्या मुंबईकरांना सध्या डोळ्यांच्या साथीने हैराण केले असून या साथीचे प्रमाण वाढत असल्याने रुग्णांनी घरी बसून आराम करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गेल्या आठवडय़ापासून मुंबईत डोळ्यांची साथ पसरू लागली आहे.

ह्या साथीचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने रुग्णांनी बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. जे. जे. रुग्णालयाच्या नेत्र विभागात दिवसाला ४० रुग्ण डोळ्यांच्या साथीवर उपचारासाठी येत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.तात्याराव लहाने यांनी सांगितले. गेल्या आठवडय़ात रोज २० रुग्ण येत होते.

मात्र या आकडय़ात दुपटीने वाढ झाल्याने हा आजार पसरत असल्याचे दिसून येत आहे. डोळ्यांच्या आजारात व्हायरल डोळे येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे लहाने यांनी सांगितले. या प्रकारात डोळ्यांना सूज येते. सध्या मुंबईकरांना व्हायरल प्रकारात मोडणारे डोळे येत असल्याचे त्यांनी सांगितले. डोळ्यांवर घरगुती उपाय करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असेही त्यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment