विंडीज दौ-यासही मुकणार रोहित शर्मा

rohit-sharma
नवी दिल्ली : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात जायबंदी झालेला भारताचा सलामीवीर राहित शर्माला वेस्ट इंडिज विरूध्दच्या एकदिवसीय सामन्याला मुकावे लागणार आहे.

बीसीसीआयने प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रोहित हाताच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्यामुळे वेस्ट इंडिज विरूध्दच्या एकदिवसीय मालिकेत तो खेळू शकणार नाही. बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिजियो त्याची काळजी घेत आहेत. पण ३० ऑक्टोबरपासून सुरू होणा-या वेस्ट इंडिज विरूध्दच्या कसोटी मालिकेत तो खेळू शकेल, असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन सलामीला उतरण्याची शक्यता आहे.

Leave a Comment