आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डबल धमाका

inchone
इंचेऑन – सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी दस-याच्या मुहूर्ताला भारताच्या खात्यात आणखी दोन सुवर्णपदकांची भर पडली असून भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डीसंघाने अंतिम फेरीत इराणलाच नमवून दोन्ही सुवर्णपदके मिळवली.

इराणवर २७-२५ असा निसटत्या दोन गुणांच्या फरकाने भारतीय पुरुष संघाने विजय मिळवला तर, भारतीय महिला संघाने इराणवर ३१-२१ असा सहज विजय मिळवला. भारतीय पुरुष संघाने सलग सातव्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली तर, महिला संघाने सलग दुस-यांदा सुवर्णपदक मिळवले.

मागच्या २०१० मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत पहिल्यांदा महिला कबड्डीचा आशियाई स्पर्धेत समावेश झाला होता. पुरुषांचा अंतिम सामना रंगतदार झाला. इराणने भारताला तुल्यबळ लढत दिली.

भारतीय संघाने पिछाडीभरुन काढत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पहिल्या वीस मिनिटात इराणकडे दहा गुणांची आघाडी होती. भारताने वीसाव्या मिनिटानंतर खेळ उंचावत इराणची आघाडी कमी केली आणि सामन्याच्या ३७ व्या मिनिटाला भारताला आघाडी मि्ळाली. त्यानंतर भारताने निसटत्या दोन गुणांच्या फरकाने विजय मिळवला.

Leave a Comment