राष्ट्रवादीने केली जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात

ncp
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आज गांधी जयंतीचा मुहुर्त साधून पक्षाचा निवडणुक जाहीरनामा प्रसिध्द केला असून यात पायाभूत सुविधा देणा-या आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.

मुंबईत चैत्यभूमी परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक यासह मुंबई पोलिसांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मुंबईत १० एकर जागा मिळवून देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच ६५ वर्षांपुढील अल्पभूधारक शेतक-यांना निवृत्तीवेतन, बारावी पास विद्यार्थांना लॅपटॉप आणि मोफत वाय-फाय सुविधा, औरंगाबाद, नाशिकसह नागपूर शहरात मोनोरेल सुरू करणे, प्रत्येक जिल्हा विमानतळाने जोडणे, बस स्टँडवर २० रूपयांत सकस आहार, जीवनदायी आरोग्य योजनेत दुपटीने वाढ यासह अनेक आश्वासनांचा जाहीरनाम्यात समावेश आहे.