काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे आज प्रकाशन

congress
मुंबई – आज गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन दादरच्या टिळक भवन येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, समन्वय समितीचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे उपस्थित राहणार आहेत.

‘आम आदमी’ला केंद्रस्थानी ठेवून हा जाहीरनामा सर्वसमावेशक बनवला आहे. यामध्ये काय काय असेल याची सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली असताना, जाहीरनामा प्रसिद्ध करण्यातही काँग्रेस पुढे राहणार आहे.

Leave a Comment