
फलटण (सातार) – बाळासाहेब ठाकरेंनी एक ठेवलेल्या महाराष्ट्राचे भाजपला तुकडे करायचे आहेत आणि यासाठी शिवसेना त्यांना मदत करणार नसल्यामुळे त्यांनी युती तोडली, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर केला. सातारा जिल्ह्यातील फलटण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नंदकुमार तासगावकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मोदींवरही चालले शिवसेनेचे बाण
भाजप आणि मोदी लाट आता उरली नसल्याचा पुनर्रुच्चार उद्धव ठाकरे यांनी येथे केला. ते म्हणाले, ‘मोदी लाट नव्हती हे आम्ही कधी नाकारलेच नाही. मोदी लाट होती, मात्र त्यासोबतच शिवसेनेची साथ होती.’ सातारा लोकसभेचा उल्लेख करुन उद्धव म्हणाले, महाराष्ट्रात मोदी लाट होती तर, मग सातार्यात ती का चालली नाही, असा सवाल त्यांनी केला.
