राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात

raj
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, ते ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या पाच दिवसांत अमरावती, यवतमाळ, जळगाव आदी ठिकाणी १५ प्रचारसभा घेणार असल्यामुळे आजपासून महाराष्ट्रात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

मनसेच्या प्रचाराचा नारळ मुंबईत रविवारी फोडल्यानंतर राज ठाकरे आजपासून प्रचारासाठी राज्यभरात जाणार आहेत. त्यांच्या आज, ३० सप्टेंबरला अमरावतीतील दर्यापूर, वलगाव आणि चांदूर येथे सभा होतील. १ ऑक्टोबरला यवतमाळ येथील वणी, हिंगण घाट आणि औरंगाबाद , २ ऑक्टोबरला शेगाव, पाचोरा, सिल्लोड , ३ ऑक्टोबरला पैठण, धनसावंगी, पाथरी येथे आणि ४ ऑक्टोबरला नांदेडमधील हिंगोली गेट, लोहा आणि निलंगा येथे प्रचारसभा होतील.

Leave a Comment