
न्यूयॉर्क – ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना मोदी विरोधी असल्याचे सांगत येथील मेडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर मारहाण करण्यात आली. सोशल मीडियावर या घटनेसंबंधीचा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानंतर त्याचा काँग्रेससह अनेकांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
ज्येष्ठ पत्रकाराला मेडिसन स्क्वेअरवर धक्काबुक्की
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा कव्हर करण्यासाठी राजदीप सरदेसाई भारतातून गेले आहेत. मोदी मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करणार होते त्याआधी स्टेडियम बाहेर सरदेसाई त्यांच्या चॅनलसाठी वार्तांकन करत असताना ही घटना घडली आहे.
पहा त्याचा व्हिडीओ
