आणखी एका मॉडेलने केली आत्महत्या

suicied
मुंबई- सोमवारी अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील न्यू म्हाडा या ६ए इमारतीमधील फ्लॅट नं १२०६मध्ये प्रसिद्ध मॉडेल अर्चना पांडे हिने आत्महत्या केली. अर्चनाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अर्चनाच्या शेजा-यांनी तिच्या घरातून वास आल्याने पोलिसांना फोनवरून महिती दिली. त्यानंतर तीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना अर्चनाच्या घरातून चिठ्ठी सापडली आहे. प्रियकरासोबत नातेसंबंधातील तणाव आणि आर्थिक अडचणींमुळे तीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अर्चना या घरात एकटीच रहात होती. मॅडलीसह तीने काही दक्षिण चित्रपटात देखील काम केले आहे.

Leave a Comment