एटीएममधून सोने चांदीची खरेदी

goldatm
सिगापूर – एटीएममधून पैसे काढणे यात आता विशेष कांही राहिलेले नाही. नवीन तंत्रज्ञानाच्या या दुनियेत एटीएममधून पाणी मिळणेही शक्य झाले आहे. सिंगापूरने यापुढेही मजल मारली असून त्यांनी आशियातील पहिले सोने चांदी एटीएम कार्यरत केले आहे.

या एटीएम मधून ग्राहक सोने चांदीची वळी, दागिने खरेदी करू शकणार आहेत. अर्थात १ ते १० ग्रॅम या वजनातील वळी किवा दागिने येथून खरेदी करता येणार आहेत. सोने चांदीचे भाव बाजाराभावानुसार बदलते राहणार आहेत. सिंगापूरच्या दोन हॉटेल रिसॉर्टमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. एशिया गोल्ड एटीएम कंपनीने ही सुविधा रिसॉर्ट वर्ल्ड सेंटोसा व मरीना बे सँडस या दोन हॉटेलमध्ये पुरविली आहे.

Leave a Comment