रताळ्याचे घारगे

gharge
नवरात्र सुरू असल्याने अनेक कुटुंबातून नवरात्राचे उपवास सुरू आहेत. उपवास असला तरी पोटपूजा करावी लागतेच आणि नऊ दिवस उपवासाचे कोणते पदार्थ करायचे असा गृहिणींना मोठा प्रश्नही पडतो. त्यासाठी येथे झटपट तयार होणारे पदार्थ देत आहोत. विशेष म्हणजे या पदार्थांमुळे अॅसिडीटी होणार नाही आणि जास्त कॅलरीज पोटातही जाणार नाहीत.

रताळ्याचे घारगे
साहित्य – रताळी, शिंगाडा पीठ, साखर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि तूप
कृती – प्रथम रताळी उकडून साले काढून मऊ कुसकरून घ्यावीत. त्यानंतर १ वाटी शिंगाडा पीठात साधारण १ वाटी कुसकरलेला रताळे गोळा, दोन ते तीन चमचे साखर, थोडेसे मीठ, जिरे पावडर एकत्र करून मळावे. चांगला गोळा तयार होईल. फार कोरडे वाटल्यास थोडेसे दूध घालावे. मळलेला गोळा दहा मिनिटे झाकून ठेवावा.

त्यानंतर पुन्हा एकदा तुपाचा हात लावून गोळा मळावा आणि प्लॅस्टीकच्या कागदावर हातानेच थापून पुरीच्या आकाराचे घारगे करावेत. तुपात अथवा तेलात सोनेरी गुलाबी रंगावर तळून काढावेत. लिंबाचे गोड लोणचे अथवा उपासाच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करावेत.

Leave a Comment